29.8 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ तिरोडा आगारातील बसचालकांची दबंगगीरी

तिरोडा आगारातील बसचालकांची दबंगगीरी

0
32

तिरोडा,दि.25ः- राज्य परिवहन महामंडळाच्या तिरोडा आगारातील बस चालकांच्या दबंगगीरीमुळे प्रवाशांना वेठीस धरले जात असून आगार प्रमुखांकडे तक्रार केल्यानंतरही काहीही सुधारणा होत नसल्याने प्रवाशामध्ये नाराजीचा सुर दिसून येत आहे.त्याचे असे कि 24 जानेवारीला तिरोडा आगाराची तिरोडा-चांदपूर ही बस फेरी चांदपूर येथून 12वाजता तिरोड्याकडे परतीला निघाली.त्या दरम्यान प्रवाशांनी बसचालकाला हात दाखवून बस थांबविण्याची विनंती केली,मात्र बसचालकाने वाहन चालवतानाच प्रवाशांना उद्देशून तुमच्या घरासमोर बस थांबत नाही अशी शिविगाळ करीत बस पुढे नेली.जेव्हा की त्याबसमध्ये फक्त 10 प्रवासी बसलेले होते.जेव्हा की परिवहन मंडळ हात दाखवा बस थांबवा चे ब्रीद घेऊन प्रवाशी संख्येसोबतच आगाराचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करा असे सांगते.परंतु याठिकाणी मात्र उलट बघायला मिळाले असून या मार्गावरील बहुतांश बसचालक अशाच प्रकारचा व्यवहार करीत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांची असून आगारप्रमुखांने यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.