35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ खा.पटेलांच्या हस्ते डुंडा येथे बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण

खा.पटेलांच्या हस्ते डुंडा येथे बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण

0
23

blank

सडक अर्जुनी,दि.28ः- तालुक्यातील डुंडा/पांढरी येथे जननायक क्रांतिसुर्य बिरसामुंडा यांच्या पुतळ्याच्या अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल्लभाई पटेल यांच्या हस्ते आज सोमवारला पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे खासदार मधुकर कुकडे होते.यावेळी उदघाटक म्हणून बोलतांना खा.पटेल यांनी बिरसा मुंडा यांनी समाजासाठी केलेले कार्य,त्याग,बलिदान हे कधीही विसरता येणारे नसून त्यांच्या आदर्श विचारांची जोपासणा करणे प्रत्येक समाजाची जबाबदारी असल्याचे विचार व्यक्त केले.याप्रसंगी  प्रदेश प्रतिनिधी तथा किसान सभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  मनोहर चंद्रिकापुरे,जिल्हा परिषद गटनेते  गंगाधर परशुरामकर,रमेश ताराम, रमेश चुरे,बाजार समिती सभापती अविनाश काशीवार, नरेश भेंडारकर, मंजु डोंगरवार,ईंदु परशुरामकर,सरपंच इंजि.डि.यु.रहागंडाले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील बांधव उपस्थित होते.

blank