30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ पत्रकारभवनाच्या जागेला घेऊन तहसिलदारांना भेटणार शिष्टमंडळ

पत्रकारभवनाच्या जागेला घेऊन तहसिलदारांना भेटणार शिष्टमंडळ

0
19

गोरेगाव,दि.२८ः-गोरेगाव तालुका युवा पत्रकार संघाच्या प्रजासत्ताकदिनी झालेल्या बैठकीत गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या पत्रकार भवनाच्या जागेसह इतर मुद्यावर चर्चा करण्यासाठी ३१ जानेवारीला सकाळी ११ वाजता तहसिलदार गोरेगाव यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकारसंघाचे अध्यक्ष हौसलाल रहागंडाले होते.पत्रकार संघाच्या सभेच्या सुरवातीला पत्रकारसंघाच्या निधन पावलेल्या सदस्यांनी श्रध्दाजंली वाहण्यात आली.त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकांनी अनेक विषयावर चर्चा करीत संघ मजबूत करण्यासोबतच गेल्या अनेक वर्षापासून प्रलqबत असलेल्या नियोजित पत्रकार भवन निर्मिती जागेच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.बैठकिचे संचालन सचिव डिलेश्वर पंधराम यांनी केले.आभार उत्तम रामटेके यांनी मानले.बैठकिला संतोष नागनाथे,रणजित सरोजकर,राजु मेश्राम,नरेंद्र भड,प्रमोद नागनाथे,खेमेंद्र कटरे,शालिकराम कोल्हे,नरेंद्र रामटेके,विजय पाल,मनोज सरोजकर आदी सदस्य उपस्थित होते.