आरमोरी नपच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा झेंडा

0
8

गडचिरोली,(अशोक दुर्गम)दि.28ः-जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेल्या आरमोरी नगरपरिषदेच्या पहिल्या पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहिर झाला असून भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासह 8 नगरसेवक निवडून आपला झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत काॅंग्रेसला सहा आणि भाकप, शिवसेना व परिवर्तन पॅनलला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविता आला.काँग्रेसला याठिकाणी अंतर्गत राजकीय मतभेदाचा फटका बसला असून विधानसभेच्या निवडणुकीतही याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागणार अशी चर्चा सुरु झालेली आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार पवन नारनवरे यांनी 3 हजार 819 मते घेत विजय मिळविला. परिवर्तन पॅनलचे उमेदवार प्रा. विजय बगडे यांना 3 हजार 320, तर काॅंग्रेसचे तेजेश मडावी हे 2 हजार 942 मते घेत तिसर्या क्रमांकावर राहिले. भाजपच्या विजयासाठी आमदार कृष्णा गजबे, सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी मोर्चेबांधणी केली होती.