33.8 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home मराठवाडा/खान्देश पाडोंझरी ग्रामसभेत महत्त्वपूर्ण विषयांवर ठराव

पाडोंझरी ग्रामसभेत महत्त्वपूर्ण विषयांवर ठराव

0
25

संख(राजेभक्षर जमादार),दि.30ः-जत तालुक्यातील पांडोझरी ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विषयावर प्रदीर्घ चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अनेक महत्त्वपूर्ण विषय मार्गी लावण्याचा संकल्प करण्यात आला.यावेळी उपसरपंच नामदेव पुजारी यांनी शिस्तबद्ध व संयमी पद्धतीने कामकाज हाताळल्याने प्रत्येक प्रश्नावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
ग्रामसभेत प्रामुख्याने वैयक्तिक लाभाच्या योजनेचे लाभार्थी निवडणे, वैयक्तिक शौचालय मंजूर करणे, चारा छावणी किंवा चारा डेपो मागणी करणे, पादंण रस्ते मंजूर करणे, पर्यावरण संतुलित योजनेमध्ये गावाचा समावेश करणे, विकासकामांचा कृती आराखडा, व्यायाम शाळा प्रस्ताव पाठविणे अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविणेकामी निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक पोतदार यांनी सांगितले.
या ग्रामसभेत सरपंच जिजाबाई कांबळे, उपसरपंच नामदेव पुजारी, सदस्य तुकाराम कोरे, आबासाहेब लोखंडे, आपा कटरे, रूकमिनी गडदे, कमलाबाई पुजारी, शिवबाई मांग, माजी जि प अध्यक्ष आण्णासाहेब गडदे , शिवापा बाबानगर, विठोबा बिराजदार, सुभाष कांबळे ,सतीश बिराजदार , जि प शाळेचे शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस व
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपसरपंच नामदेव पुजारी म्हणाले, मी एकटाच गावचा उपसरपंच नसून, आपण सर्वच उपसरपंच आहोत, या भावनेतून गावाचा विकास करूया. गाव नक्कीच सुजलाम् सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही.असे आपले मनोगत व्यक्त केले .तसेच या ग्रामसभेला गावातील ग्रामस्त उपस्थित पार पाडले.