नाबार्ड कडून निधी प्राप्त करण्यात जिल्हा मध्यवर्ती बँक यशस्वी

0
39
भंडारा,दि.30 : जिल्ह्यातील ३६८ विविध सेवा सहकारी संस्थांच्या प्रशासकीय कामासाठी निधी प्राप्त करण्यात जिल्हा बँकेला यश आल्याने जिल्ह्यातील विविध सेवा सहकारी संस्था आनंदात आहेत. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्षम प्रयत्न केल्याने अध्यक्ष सुनिल फुंडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहेत.
दि. भंडारा डिस्ट्रीक सेंट्रल को.ऑप. बँक लि. भंडारा ला सलग्न असलेल्या एकूण ३६८ सेवा सहकारी संस्थेपैंकी सन २०१४-१५ मध्ये ५१ संस्था, सन २०१५-१६ मध्ये १०१ संस्था व सन २०१६-१७ मध्ये १५९ संस्थांना सक्षमी करणासाठी शासनाने एकूण रू.१५४४५६२५(अक्षरी – एक कोटी चौपन लक्ष पंचेचाळीस हजार सहासे पंचवीस रूपये) ची तरतुद मंजुर केली आहे. लवकरच सदर रक्कम पात्र संस्थेच्या बचत खात्यात जमा करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात सक्षमीकरणासाठी लागणार्‍या आर्थिक मदतीचे प्रस्ताव सर्व संस्थांनी बिनचूक तयार करून तसेच सन २०१६-१७  व सन २०१७ -१८ चे व्याज अनुदान मागणी प्रस्ताव तत्परतेने तयार करून तातडीने आपल्या संबंधीत सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करावे. जेणे करून संस्थांना संस्थांच्या खर्चासह गट सचिवांचे पगार वेळीच करणे सोयीचे होईल. असे आवाहन दि. भंडारा डि.से.को.ऑप.बँक लि.भंडारा चे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी केले आहे.
सदर निधी नाबार्ड च्या योजनेतून प्राप्त होणार असून संस्थांना कॅश कॉऊंटर, सेफ (तिजोरी), फाईल ठेवण्यासाठी सुरक्षीत आलमारी, चार आधुनिक खुर्च्या, एक टेबल, सोलर पॅनल किंवा इंन्वरटर सोबत एक कम्प्युटर, एक प्रिंटर, एक टेबल फॅन व कार्यालयात प्रकाशासाठी दोन ट्युबलाईट, रूपये किसान कार्ड स्विपींग करण्यासाठी पॉस मशिन, खत खरेदी विक्री तसेच इतर व्यवसायासाठी आर्थिक मदत याशिवाय अ‍ॅटोमेटीक बिलींग मशिन, डाटा मॅनेजमेंट सॉफ्टवेअर इत्यादी वस्तुंच्या खरेदीसाठी २ लक्ष रूपये नाबार्डच्या अटी व शर्ती नुसार उपलब्ध होणार आहेत. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी प्रसंगी दिली.  त्यासाठी प्रत्येक संस्थेने नाबार्डच्या नियमाप्रमाणे किमान निकष पुर्ण करणे गरजेचे असल्याचे सांगुन प्रत्येक संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या संस्थेची संपुर्ण माहिती प्रस्ताव आपल्या संबंधीत तालुका साहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करावा किंवा भंडारा जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलासराव देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी  केले आहे.