24.3 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home गुन्हेवार्ता तुमसर तालुक्यात मुलाने केला वयोवृद्ध वडिलांचा खून

तुमसर तालुक्यात मुलाने केला वयोवृद्ध वडिलांचा खून

0
34

तुमसर,दि.0४ : घरगुती वादात काठीने बेदम मारहाण करून मुलाने आपल्या वृद्ध पित्याचा खून केल्याची घटना तुमसर तालुक्यातील पचारा या गावी रविवारच्या रात्रीला घडली.
तीर्थराज वरकडे (७०) असे मृताचे नाव आहे. रविवारी रात्री शुल्लक कारणावरून वाद सुरू झाला. या वादात मुलगा राजू तीर्थराज वरकडे (४५) याने वडिलांला काठीने बेदम मारहाण केली. यातच तीर्थराजचा मृत्यू झाला. या प्रकरणी तीर्थराजची पत्नी कमलाबाई यांनी तुमरसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.