25.1 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home शैक्षणिक स्व.मनोहरभाई पटेल जयंतीनिमित्त सुवर्ण पदक वितरण समारोह ९ रोजी

स्व.मनोहरभाई पटेल जयंतीनिमित्त सुवर्ण पदक वितरण समारोह ९ रोजी

0
36

मप्रचे मुख्यमंत्री कमलनाथ, अभिनेते संजय दत, उद्योगपती अनिल अग्रवाल येणार
गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील प्राविण्य प्राप्त विद्याथ्र्यांचा होणार सत्कार
गोंदिया,दि.05: दरवर्षीप्रमाणे स्व.मनोहरभाई पटेल अकादमीच्यावतीने ९ फेबु्रवारी रोजी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात सुवर्ण पदक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, अभिनेते संजय दत, उद्योगपती अनिल अग्रवाल, खासदार प्रफुल्ल पटेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील प्राविण्य प्राप्त विद्याथ्र्यांचा मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदकाने सम्मान करण्यात येणार आहे.
दरवर्षी स्व.मनोहरभाई पटेल अकादमीच्या वतीने जयंती समारोहाचे औचित्य साधून गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील प्राविण्य प्रााप्त विद्याथ्र्यांना सुवर्ण पदकाने सम्मानित केले जाते. यावर्षी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे समारोहाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते संजय दत, उद्योगपती अनिल अग्रवाल तर अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल हे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच अतिथी म्हणून मध्यप्रदेशचे मंत्री प्रदीप जायस्वाल, म.प्र. विधानसभेचे उपाध्यक्ष हिना कावरे, खासदार मधुकर कुकडे, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते नाना पटोले, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार गोपालदास अग्रवाल, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, विलासराव श्रृंगारपवार, आ.कामलाल शहारे, माजी खा.विश्वेश्वर भगत, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, आ. संजय उईके, माजी आ. अनिल बावणकर, रामरतन राऊत, सेवक वाघाये, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आ. दिलीप बन्सोड, अकादमीच्या अध्यक्ष वर्षाताई पटेल उपस्थित राहणार आहेत.blank
यावेळी गुजराती नॅशनल हायस्कूलमधून दहावीमध्ये प्रथम स्थान प्राप्त मेघा मुकेश बिसेन, जिल्ह्यातून दहावीमध्ये प्रथम स्थान प्राप्त जी.एम.बी. हायस्कूल अर्जुनी-मोरगावची अवंती अक्षय राऊत, शांताबेन मनोहरभाई पटेल ज्युनियर कॉलेलमधून बारावीमध्ये प्रथम आलेल्या समर्थ रुपेश वरु, दहावीमध्ये सरसवती ज्युनियर कॉलेज अर्युनी-मोरगाव येथील विद्यार्थी जयंत धरमजी लोनारे, बी.ए.श्रेणीमधून प्रथम आलेली नमाद महाविद्यालयाची विद्यार्थिनी रक्षंदा दिलीप पशिने, जिल्ह्यातून बी.कॉम. श्रेणीत प्रथम आलेला नमादचा विद्यार्थी संदेश सुनील केडिया, गोंदिया जिल्ह्यातून बीएससी श्रेणीत प्रथम आलेली सी.जे. पटेल तिरोड्याची विद्यार्थिनी कल्पना प्रल्हाद भगत,बी.ई.श्रेणीत प्रथम एमआयटीची विद्यार्थिनी सानिया ताहिर अली हुसैन, भंडारा जिल्ह्यातून दहावीतमध्ये प्रथम वैनगंगा विद्यालय पवनीची विद्यार्थिनी साक्षी सुनील घावले, बारावीमध्ये प्रथम नानाजी जोशी ज्यु.कॉलेज शहापूरचा विद्यार्थी रितेश पुरुषोत्तम हर्षे, बी.ए. श्रेणीत प्रथम मनोहरभाई पटेल कॉलेज साकोलीचा विद्यार्थी गुलशन विजय शहारे, बी.कॉम श्रेणीत उत्तीर्ण जे.एम. पटेल कॉलेज भंडाराची विद्यार्थिनी निलीमा शांताराम चौधरी, बी.एस.सी. श्रेणीत प्रथम जे.एम. पटेल कॉलेज भंडाराचा विद्यार्थी प्रज्वल राकेश राजपूत, बी.ई.श्रेणीत प्रथम आलेला एमआयटी शहापूरची विद्यार्थिनी वैष्णवी रमेश शेंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.