24.7 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ अग्रवाल अध्यापक विद्यालयात सुरक्षा सप्ताह

अग्रवाल अध्यापक विद्यालयात सुरक्षा सप्ताह

0
80

गोंदिया,दि.08ः- : येथील स्वः शंकरलाल अग्रवाल कॉलेज आफ टिचिंग स्टडीज सूर्याटोला येथे शिक्षक व्यक्तिमत्व शिबिराअंतर्गत 30 वा  रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला.वाहतुक शाखेचे हेड काॅन्स्टेंबल नंदकिशोर बोरकर यांनी अपघाताचे विविध कारणे व त्यावर उपाय योजनेची माहिती देत दुचाकी चालवताना  हेल्मेटचे महत्व विशद केले.वशीम पठाण यांनी अपघाताला कारणीभूत असलेली चित्रफित दाखवून माहिती दिली.कार्यक्रमाला प्राचार्य अतिकूर शेख, प्रा.अरविंद बागडे, प्रा.पवन पांडे,व्यवथापक विजय मदनकर आदि उपथीत होते.शिबिराचे संचालन कु.हेमलता हिने केले तर आभार कु.पायल हिने मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रोशन हेमने,डीलेस्वर रहांगडाले आणि सर्व विध्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.