29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ प्रोग्रेसिव्ह शाळेत शिवाजी जयंती उत्साहात

प्रोग्रेसिव्ह शाळेत शिवाजी जयंती उत्साहात

0
22

गोंदिया,दि.22 : श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, द्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह मराठी शाळेत मोठय़ा उत्साहात शिवाजी महाराज यांची ३८९ वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार होते तर प्रमुख उपस्थितीत संस्था सचिव डॉ. निरज कटकवार, प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, वीणा कावळे, निधी व्यास, वर्षा सतदेवे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माता शारदा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पावनखिंडवरील प्रसंग आपल्या पथनाट्याच्या माध्यमातून सादर करून उपस्थितांचे मन मोहून घेतले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. निरज कटकवार यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, माता जिजाऊंमुळे शिवाजी घडले व शिवाजींच्या मनात आत्मविश्‍वास व दृढ निश्‍चय असल्यामुळे त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या या कार्यला मानाचा मुजरा अशा प्रकारे संबोधित केले व उत्कृष्ट कलाकृती सादर करणार्‍या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या कुमुदिनी तावाडे, वाय.आशा राव, तुमेश पारधी, अनिल पटले, वंदिता हेमने, कविता भांडारकर, सुशिला भोयर, पुस्तकला फुंडे, मंगला राणे, नितीन पशिणे, वैशाली वैद्य, जयश्री दमाये, गुरुदास भेलावे, राहुल रामटेके, दिव्यांशू जैस्वाल यांनी सहकार्य केले.