सडक अर्जुनी,दि.22 : तालुक्यातील डुंडा पांढरी येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या मुर्तीचे अनावरण तसेच तेली समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन २३ फेब्रुवारीला दु. १२ वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद््घाटन माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांच्या हस्ते ना. राजकुमार बडोले यांचे अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. दीपप्रज्ज्वलन माजी. आ. अनिल बावणकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर मुख्य अतिथी म्हणून शिवराम गिर्हेपुंजे, शेषराव गिर्हेपुंजे, नगरसेविका कल्याणीताई भुरे, माजी जि.प. सदस्य राजेश चांदेवार, जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर, शिलाताई चव्हाण, विजय बिसेन, माजी सभापती रेखाताई भाजीपाले, संतोष खोब्रागडे, अविनाश काशिवार, नरेश भेंडारकर, झामसिंग येरणे, दिलीप गभणे, सागर काटेखाये, अनिल राजगिरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्री ८.वा. आर्केस्ट्राचे कार्यक्रमाचे आयोजन केले असून उद््घाटन सरपंच डी.यु. रहांगडाले यांच्या हस्ते, मनोहरराव चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. रामचंद्र बागडकर, माधव हटवार यांनी केले आहे.





