40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ जिल्हाधिकार्‍यांची सामूहिक दुधाळ जनावर संगोपण केंद्रास भेट

जिल्हाधिकार्‍यांची सामूहिक दुधाळ जनावर संगोपण केंद्रास भेट

0
26

blank

गडचिरोली,दि,22ः– जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील तोडसा येथील सामूहिक दुधाळ जनावर संगोपण केंद्रास व रमाई महीला ग्रामसंघ बचत गट तसेच ग्राम पंचायत कार्यालयास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी २१ फेब्रुवारी रोजी भेट देवून पाहणी केली
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तालुक्यातील तोडसा सामुहीक दुधाळ केंद्रास भेट आकस्मिक भेट देऊन दुधाळ केंद्राच्या कामाचा आढावा घेतला व गाय संगोपण करून लोकांचा आर्थिक उत्पन्नात वाढ करणे करिता मार्गदर्शन केले. तसेच तयार करण्यात आलेल्या गांडुळ खताची पाहणी बायोगॅस यंत्राची पाहणी केली. त्यानंतर ग्राम पंचायत कार्यालयाच्या भवनात विविध विकास कामाबद्दल चर्चा केली. रमाई ग्रामसंघ गट तोडसा यांना खरेदी विक्री करून आर्थिक उत्पन्नात वाढ कशी करायची याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी कैलास अंडिल, तहसीलदार थेटे, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, पशुधन विकास अधिकारी डॉ. उमेश सोनटक्के, तोडसाचे सरपंच प्रशांत आत्राम व पोलिस पाटील रैजु गावडे, शेतकरी बालाजी वेळदा, विजय दहागावकर, दिनेश तिम्मा व गावातील नागरिक उपस्थित होते.

blank