25.4 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home मराठवाडा/खान्देश औरंगाबाद जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांचे निधन

औरंगाबाद जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांचे निधन

0
34

औरंगाबाद,दि.25ः-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे विद्यामान अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश दयाराम पाटील (वय 78) यांचे आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.2004 पासून त्यांनी बँकेचे अध्यक्षपद भुषवले. विविध पक्षातील विविध जाती-धर्माचे 21 संचालकांना बिनविरोध निवडुण आणत ही बँक यशस्वीरित्या सांभाळली. घरी असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा झटका आला, त्यांना तात्काळ समर्थनगरातील साई रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योती मालवली. 40 ते 45 वर्षांपासून ते संचालक होते. यापैकी 26 ते 27 वर्षे त्यांनी बँकेचे अध्यक्षपद भुषवले. त्याच्या काळात बँकेला सुवर्णकाळ पाहावयास मिळाला. त्यांच्या बँकेच्या अध्यक्षपदच्या काळातच सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे संचालक आहेत. ते सर्व बिनविरोध त्यांच्याच नेतृत्वामुळे निवडूण आले होते.110 कोटीची तोट्यात असलेली ही बँक त्यांनी नफ्यात आणली.11(1) कलम बँकला लागणार होती. बँक डबघईस येणार होती. त्या बँके त्यांनी पुरनरजीवन आणले. कन्नडेच माजी आमदार नितीन पाटील यांचे ते वडील होते. अचानक झालेल्या या घटनेमूळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शोककळा पसरली आहेत.