‘गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है’; विरोधकांची घोषणाबाजी

0
15

मुंबई,दि.25(वृत्तसंस्था) : गांधी हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है… आरएसएसचं समर्थन करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो… अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार टाकतानाच सरकारविरोधात विधानभवन परिसरात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

यावेळी विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे, विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार हेमंत टकले, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार विक्रम काळे, आमदार विदया चव्हाण, आमदार ख्वाजा बेग, आमदार प्रकाश गजभिये, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार गणपतराव देशमुख, आमदार अनिकेत तटकरे, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार ज्योती कलानी, आमदार श्रीमती सुमनताई पाटील, आमदार श्रीमती संध्याताई कुपेकर आदींसह काँग्रेस व मित्र पक्षाचे आमदार उपस्थित होते. विरोधी पक्ष सरकारविरोधात पहिल्याच दिवशी आक्रमकपणे लढा देणार असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले असल्याने अधिवेशनामध्ये वेगळीच रंगत पाहायला मिळणार आहे.