नांदेडच्या म्युझियममध्ये आढळले मृत प्राणी

0
16

नांदेड,दि.25ःःनांदेडच्या गुरुव्दारा सचखंड बोर्डा अंतर्गत असलेल्या गुरुगोविंदसिंघजी म्युझियम मध्ये काल रात्री अचानक तेथे ठेवलेल्या प्राण्यांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदविण्यात आली आहे.

गुरुतागद्दी सोहळ्याच्यावेळी सचखंड गुरुव्दारा बोर्डाच्या वतीने श्री गुरुगोविंदसिंघजी महाराज यांची माहिती देणारे संदेश तसेच काही प्राणी देखील या गुरुगोविंदसिंघजी म्युझियम मध्ये ठेवण्यात आले. काल रात्री अचानक या म्युझियम मधील हरिण, ससे आणि पोपट मृत अवस्थेत आढळले. यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या म्युझियमसाठी एक विशेष अधिकारी रविंद्रसिंघ लांबा यांनाही नियुक्त करण्यात आले होते. बाहेर राज्यातून येणाऱ्या अनेक पर्यटकांसाठी हे म्युझियम खुले ठेवण्यात आले आहे. अचानकपणे या म्युझियम मधील प्राणी मृत पावल्याने या परिसरात एकच गोंधळ उडाला. याबाबत गुरुव्दारा सचखंड बोर्डाचे अधीक्षक वाधवा यांना लांबा यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानुसार याबाबत रितसर वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. लांबा यांच्या म्हणण्यानुसार काही मोकाट कुत्र्यांनी याठिकाणी हल्ला केला असावा व त्यांनी या प्राण्यांचे जीव घेतल्याची माहिती प्राथमिकरित्या समोर आली आहे. वनविभागाचे अधिकारी याबाबत तातडीने घटनास्थळी पोहंचले आणि त्यांनी याचा पंचनामा केला.