24.6 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ हत्तीडोई येथील पर्यटन विकासासाठी दीड कोटींचा निधी

हत्तीडोई येथील पर्यटन विकासासाठी दीड कोटींचा निधी

0
28

भंडारा,दि.0५ : भंडारा तालुक्यातील हत्तीडोई हे पर्यटनस्थळ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटक याठिकाणी भेट देतात. तसेच बौद्ध धर्माचे अनेक सामाजिक कार्यक्रम याठिकाणी होत असतात. परंतु, मूलभूत सोयीसुविधा याठिकाणी नसल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत होती. या पर्यटन स्थळाचा विकास करण्याकरिता शासनाच्या पर्यटन विभागाकडून निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी हत्तीडोई पर्यटन संस्थेकडून आ. डॉ. परिणय फुके यांच्याकडे करण्यात आली होती. आ. फुके यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन हत्तीडोईच्या विकासाकरीता १ कोटी ६0 लक्ष रुपये व पवनी येथील भाई तलावाकरीता २५ कोटींचा निधी मंजूर करावा, अशी मागणी केली. त्या अनुषंगाने हत्तीडोईसाठी १ कोटी ६0 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच दोन्ही ठिकाणी विकासाची कामे सुरू होणार आहेत.

blank