महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडात उसळली गर्दी

0
19

गडचिरोली,दि.05 : शिवरात्रीनिमित्त चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे १० दिवसांची जत्रा भरत आहे.पहिल्याच दिवशी मार्र्कंडादेव येथे मोठी गर्दी उसळली. मार्र्कंडादेव येथील रस्ते यात्रेकरूंनी भरून गेले होते.भाविक वैनगंगा नदीतून येत असल्याने नदीतही जत्रेचे स्वरूप बघायला मिळत होते.महाशिवरात्रीनिमित्त पहाटे ४ वाजेपासून शिवपिंडीची महापूजा करण्यात आली. मार्र्कंडेश्वर मंदिराच्या मुख्य गाभाºयात अभिषेक करण्यात आला. महापुजेचे मानकरी होण्याचा मान खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, बिनाराणी होळी दाम्पत्य, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, मधुकर भांडेकर दाम्पत्य, पुजारी पंकज पांडे, शुभांगी पांडे दाम्पत्य, पराग आर्इंचवार, अमृता आर्इंचवार दाम्पत्य, पं.स. सभापती आनंद भांडेकर, वर्षा भांडेकर दाम्पत्य यांना देण्यात आला. यावेळी डॉ. भारत खटी, प्र.सो. गुंडावार, तहसीलदार अरूण येरचे, यांच्या पत्नी मंदाताई येरचे, संजय वडेट्टीवार, नेहा वडेट्टीवार, मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, मंगला भांडेकर, वैशाली भांडेकर, अमोल येगीनवार, दिवाकर नैताम, दिलीप चलाख, जयराम चलाख, उज्वल गायकवाड, पुजारी श्रीकांत पांडे, नाना आमगावकर, रामू गायकवाड, जि.प. सदस्य विद्या आभारे, रिकू पालारपवार आदी उपस्थित होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही सकाळच्या सुमारास मार्र्कंडादेव येथे येऊन मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेतले. दर्शनाच्या रांगेत असलेले पहिले वारकरी मार्र्कंडादेव येथील जितेंद्र कोवे यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आला.

महाशिवरात्रीनिमित्त सोमवारी भामरागडनजीकच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. स्नानानंतर भाविकांनी महादेवाची पूजा-अर्चा केली. पहिल्याच दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक मार्र्कंडादेव येथे दाखल होऊन मार्र्कंडेश्वराचे दर्शन घेतले. आदिवासी बांधवांनी आदिवासी संस्कृतीनुसार गोत्र पूजा केली. सोमवारी रात्री आदिवासी बांधव एकत्र येऊन शंभू जागरण करणार आहेत. ढोलताशांच्या गजराने मार्र्कंडेश्वराची पूजा केली.