भंडारा,दि.07ः- गोंदिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित स्थानिक जे. एम. पटेल महाविद्यालय येथील इंग्रजी विभागात कार्यरत प्रा. भावना रॉय यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ द्धारा पी. एच. डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्रा. भावना रॉय यांनी ‘इन ए्नझामिनेशन ऑफ द प्राब्लेम्स इन एंड पोटेन्शीयल ऑफ युसींग मल्टीमीडिया एक्टीविटीस इन टिचिंग इंग्लीश लिटरेचर‘ याविषयावर शोध निंबध पूर्ण केला. त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय कुटुबिंय, मार्गदर्शक ऑबेडकर युनिवर्सिटी न्यू दिल्ली येथील सेंटर फॉर इंग्लिश लँग्वेज एजुकेशनचे डायरेक्टर डॉ. अमोल पदवाड, जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कार्तिक पनिकर,विकास ढोमणे यांना दिले. भावना रॉय यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.





