श्रमयोगी मानधन योजनेच्या माध्यमातून कामागारांच्या भविष्याचा विचार : विनोद अग्रवाल

0
39

गोंदिया,दि.07 : सन २०१४ पासून देशाचे सत्तासुत्र हाती घेतल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजातील सर्वघटकांचा सर्वसमावेश विकास करण्याचा विडा उचलला आहे. यामुळे विविध योजनांच्या माध्यमातून थेट जनमानसाला लाभ मिळेल, अशीच व्यवस्था करण्यात आली आहे. आताच नाहीतर भविष्यातही या योजना नागरिकांसाठी लाभदायक ठरतील, या दृष्टीने प्रयत्न चालु आहेत. त्यातील एक प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेंशन योजना होय. योजनेच्या माध्यमातून असंघटीत कामगारांना ३ हजार रूपये पेंशन देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असून कॉंग्रेसच्या सरकारकडून सातत्याने डावलण्यात आलेल्या शेतमजुर, कामगारांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या घोषणेने मोदी सरकार सर्वसामान्य, कामगारांच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे सिध्द करून दिले, असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.

गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्राम जब्बारटोला येथे शासनाच्या २५-१५ लेखाशिर्षक अंतर्गत मंजूर ३ लाख रूपयाच्या निधीतून रस्ताचे लोकार्पण आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.सदस्य कमलेश्वरी लिल्हारे, छत्रपाल तुरकर, भाऊराव उके, सरपंच वच्छलाबाई चिखलोंडे, उपसरपंच सेवक चिखलोंडे, ग्रा.पं.सदस्य निलिमा शहारे, दयाबाई सोनवाने, महेश रहांगडाले, सुप्रिया उंदिरवाडे, वनमालाबाई शहारे, मिनाक्षीबाई वैद्य, माजी सरपंच ब्रम्हदयाल गहेरवार, पोलिस पाटील रविंद्र बिसेन, तंमुस अध्यक्ष थामनलाल लिल्हारे, बंडू रहांगडाले, माधोराव साउतकर, शामप्रसाद चिखलोंडे, उदयलाल चिखलोंडे, कमल चिखलोंडे, आशाराम चिखलोंडे, भरतलाल चिखलोंडे, मोहन चिखलोंडे, नेतलाल लिल्हारे, मचाडे, सुभेश्वर हिरापुरे, गिरधारी हिरापुरे, हिरा लिल्हारे, भरत लिल्हारे, प्रकाश शहारे, सेवक शहारे, चैनलाल आंबेडारे, जगन आंबेडारे, जितेंद्र मोहारे, कैलाश दमाहे, सतिश गहेरवार, सेवक कटरे, भिकराम कटरे, गोमाजी राऊत, दवि पटले, दिपक शहारे, दिपक चिखलोंडे, महेंद्र चिखलोंडे, निलम उपवंशी, महेश भरणे, निलेश चिखलोंडे, हरीणखेडे, गजभिये, सोनवाने, तिलक चिखलोंडे, ब्रिजेश चिखलोंडे, भजन चिखलोंडे, दुर्गाप्रसाद चिखलोंडे, सेवक चिखलोंडे, राज चिखलोंडे, देवचंद चिखलोंडे, राजेश चिखलोंडे, भोजराज चिखलोंडे, धुरन चिखलोंडे, मुलाजी चिखलोंडे, धरम चिखलोंडे, मनिष गहेरवार, राजेश रहांगडाले, भिजेंद्र जैतवार, बाबुलाल बिसेन, महेंद्र बिसेन, बबलु जैतवार, भरणे, सुधीर वैद्य, सुनिल वैद्य, कवरे, गुड्डू चिखलोंडे, केशव ढेकवार, मेघलाल ढेकवार, कुंवर ढेकवार, छन्ना ढेकवार, कान्हा ढेकवार, विजय ढेकवार, योगेश ढेकवार, भुवन ढेकवार, जैराम ढेकवार, बघेले, धुरन ढेकवार आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.