24.8 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ मग्रारोहयो कंत्राटी कर्मचार्‍यांचे मानधन देण्याची मागणी

मग्रारोहयो कंत्राटी कर्मचार्‍यांचे मानधन देण्याची मागणी

0
46

मोहाडी,दि.0८ःःजिल्ह्यातील मग्रारोहयोअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत सर्व कर्मचार्‍यांचे माहे जानेवारी ते फेब्रुवारीपयर्ंतचे मानधन अद्यापपावेतो बँक खात्यावर जमा झाले नसल्याने मानधन त्वरित द्यावे, या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री यांना गटविकास अधिकारी रविंद्र वंजारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले.
निवेदनात ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणारे कर्मचार्‍यांचे मानधन अद्यापपावेतो मिळालेले नाहीत. जिल्ह्यातील मग्रारोहयो अंतर्गत कंत्राटी कर्मचार्‍यांचे दोन महिन्यांचे मानधन त्वरित देण्यात यावे, निधीअभावी तांत्रिक सहाय्यक यांचे माहे जानेवारी २0१८ पासूनचे प्रवास भत्ता देयके त्वरित अदा करण्यात यावे, दरवर्षीप्रमाणे लागू असलेल्या मूळ मानधनात ८ टक्के वाढीव मानधन २0१८ चे मानधनापासून लागू करण्यात यावा., आदी मागण्यांचा समावेश होता. निवेदन देतांना अंकुश बोंद्रे, राधेश्याम गाढवे, महेश निमजे, रविकांत तिडके, रमेश चौधरी, फत्तेचंद निनावे, अमोल समरीत, नितीन शिंगाडे, अनिल ठावकर, श्रीकृष्ण मते, अविनाश गणविर, कडव, सरोज बघारे, रुपेश सोनकुसरे, गुरुदेव गराडे, रोशन गराडे, अनिल खोब्रागडे इत्यादी उपस्थित होते.

blank