गोंदिया,दि.08ः- येत्या लोकसभा निवडणुकीच्या काळात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना निवडणुक कामापासून वगळण्यात यावे या विषयावर गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्यावतीने(दि.7)गुरूवारी जिल्हाधिकारी डाॅ.कादींबरी बलकवडे यांना निवेदन देत चर्चा करण्यात आली.त्यावर जिल्हाधिकारी यांनी राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. निवेदन देतेनेऴी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य रमेश तणवानी,कार्यवाह मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे,उपाध्यक्ष प्राचार्य सी.जी.पाऊलझगडे,संघ सदस्य प्राचार्य एन.जी.पाथोडे,जिल्हा मार्गदर्शक प्राचार्य खुशाल कटरे ई.पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागाच्या वतिने 21/2/2019 ते 22/3/2019 या कालावधीत ई.10 वी व .12 वीच्या परीक्षा गोंदिया जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येत असल्याने परीक्षा संचालनाचे कार्य केंद्र संचालक म्हणून मुख्याध्यापक करतात.तर विकेंद्रित मुल्यमापण पध्दती अन्वये ई.10 वी व ई.12 वी च्या परीक्षार्थ्यांच्या विविध विषयाच्या उत्तर पत्रिका तपासण्याचे कार्य शाळेच्या वेळेत मुख्याध्यापकांच्या देखरेखीत विषय शिक्षक करीत आहेत.तर काही मुख्याध्यापक स्वतः उत्तरपत्रिका तपासणीस किंवा समिक्षकाचे कार्य करतात.तर 5 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत ई.5 ते.ई.11 वी च्या शाळास्तरावरील द्वितीय सत्रांत परीक्षा आहेत.नेमक्या याच कालावधीत लोकसभा निवडणूक-2019 होणार असल्याने मुख्याध्यापकास जर निवडणूक कार्य दिल्यास गैरसोय होणार असल्याने मुख्याध्यापकांना लोकसभा निवडणूक कार्यातून वगळण्यात यावे असे म्हटले आहे.





