30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ पेंच राखीव व्याघ्रप्रकल्पात बिबट मृतावस्थेत आढळला

पेंच राखीव व्याघ्रप्रकल्पात बिबट मृतावस्थेत आढळला

0
21

blank

नागपूर,दि.16: जिल्ह्यातील पेंच राखीव व्याघ्रप्रकल्पाच्या नागलवाडी रेंजमध्ये शुक्रवारी(दि.15) दुपारी १२.३० वाजता तीन ते चार वर्षाचा बिबट मृतावस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बीट गार्ड, वनमजुर आणि गस्त घालणाऱ्या पथकाला झुडुपात बिबट मृतावस्थेत आढळून आला. लगेच त्यांनी याची माहिती वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळाशेजारील परिसर ताब्यात घेण्यात आला. परिसराची पाहणी केली, परंतु काहीच संशयास्पद आढळले नाही. घटनेची माहिती मिळताच पेंचचे उपसंचालक आणि पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृत बिबट्याच्या शरीराची पाहणी केली असता शरीरावर कोणतीही जखम आढळली नाही. त्यानंतर डॉ. सुबोध नंदागवळी, डॉ. अंकुश दुबे, डॉ. सय्यद बिलाल यांनी शवविच्छेदन केले. शवविच्छेदनात मृत बिबट्याच्या गळ्यावर गंभीर जखमा आणि रक्तस्राव झाल्याचे दिसले. मोठ्या आणि शक्तिशाली प्राण्याची शिकार केल्यामुळे या जखमा झाल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.

blank