23.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ सावली तालुक्यात धान व मका खरेदी केंद्र सुरू करा

सावली तालुक्यात धान व मका खरेदी केंद्र सुरू करा

0
34

सावली,दि.25ः-तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी धान व मका पिकांचे उत्पादन घेत आहेत परंतु तो माल विक्रीकरीता शासकीय खरेदी विक्री केंद्र तालुक्यात नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, खाजगी व्यापारी माल खरेदी करताना कवडीमोल भावाने खरेदी करून लुटमार करत आहेत, ती लुट थांबावी व शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा म्हणून सावली भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांनी राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नाम. सुधिरभाऊ मुनगंटीवार याची भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली, पालकमंत्र्यांनी धान व मका शासकीय खरेदी विक्री केद्र सुरू करण्यासंदर्भात संबंधित अधिका-यांना आवश्यक ती कार्यवाही करावी व केंद्र सुरू करावे असे निर्देश दिले, यावेळी अर्जुन भोयर, अरुण पाल व तुळशीदास भुरसे उपस्थित होते

blank