33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ ब्राम्हणवाड्यातील त्या युवकांच्या घरी खासदारांची भेट

ब्राम्हणवाड्यातील त्या युवकांच्या घरी खासदारांची भेट

0
31

अमरावती,दि.29 : पाणी प्यायला विहिरीत उतरलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा (गोविंदपूर) येथे गेल्या आठवड्यात घडली. या मृत युवकांच्या घरी जाऊन  खासदार नवनीत राणा यांनी मंगळवारला सांत्वना भेट देत कुटूबियांचे सांत्वन केले. शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
स्वप्निल संजय पेठे (१५) व रवि चरणदास अडमाले (१५) या युवकांना तहान लागल्याने ते विहिरीत उतरले व पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. पाणीटंचाईमुळेच या युवकांचा मृत्यू झाला असतांना एकाही अधिकाऱ्यांनी या युवकांच्या घरी भेट दिलेली नाही. त्यामुळे संतापलेल्या आ. रवि राणा यांनी सोमवारच्या बैठकीत खडे बोल सुनावले होते. यावेळी जि.प. सदस्य प्रकाश साबळे, जितू दुधाणे, प्रशांत डहाणे, मनीष भुयार, धनंजय भुयार, धनंजय फरतोडे, श्रीधर कोहळे, गोपाल अळमते, भीमराव परतेकी आदी उपस्थित होते.