देशाच्या प्रगतीत लोहार समाजाचे महत्वपूर्ण योगदान : विनोद अग्रवाल

0
20

ग्राम अर्जुनी येथे लोहार समाजाचा भाजप प्रवेश

गोंदिया,दि.29ः देश स्वतंत्र झाल्यापासून लोहार समाजाच्या अनेक समस्या आहेत ज्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. अनेक लोकप्रतिनिधी आले त्यांनी लोहार समाजची मते घेतली पण लोहार समाजाला आपलेसे मानले नाही आणि लोहार समाजाच्या समस्या जशाच्या तश्या राहिल्या. निवडणूक आली कि मोठमोठाली आश्वासने अनेक पुढाऱ्यांनी समाजाला दिली पण आता लोहार समाज जागा झाला असून स्थानिक लोकप्रतिनिधी ने ज्या प्रकारे समाजाची फसवणूक केली त्यांना अद्दल घडवण्याची योग्य वेळ आता आली आहे. हा देश उभा राहिला त्यात लोहार समाजचे योगदान विसरून चालणार नाही त्यासाठी वाटेल ती मदत करण्यास मी तयार आहे असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी गोंदिया जिल्हाध्यक्ष  विनोद अग्रवाल यांनी केले. ग्राम अर्जुनी येथे लोहार समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी ते बोलत होते. दरम्यान समस्त लोहार समाजाने भाजप प्रवेश केला आणि येत्या निवडणुकीत भाजप आणि  अग्रवाल यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. यावेळी लोहार समाजचे सल्लागार एस. के. साऊस्कर , महामंत्री भाऊराव उके, सरिता गौतम (सरपंच अर्जुनी ), सुजित येवले (सरपंच रावणवाडी), चंद्रशेखर शहारे, उमेंद्र गौतम , उमेश बिसेन, नरेंद्र बिसेन सालिकभाऊ हरिणखेडे,लंकेश तिवारी , किशोर दुबे, सुभाष मुंडदा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

पुढे बोलताना विनोद अग्रवाल म्हणाले कि लोहार समाज हा कलात्मक दृष्टीने संपन्न आहे पण आर्थिक दृष्ट्या सामान्य आहे. लोखंडावर वार करून हा समाज आपलं जीवन जगतो. आगीतून गरम लोखंड काढून पुरुष त्याला ऐरण वर ठेवतो आणि स्त्री त्यावर हातोड्याने वार करते आणि लोखंडाला आकार देते. खूप मेहनत करून कितीपण ऊन असले तरी पण हा समाज उन्हाळ्याच्या दिवसात गरम भट्टीजवळ बसतो. अश्या समाजाला आज पर्यंत काँग्रेस सरकारने समाजच्या मुख्य प्रवाहापासून दूरच ठेवलं. पण आता भाजप सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले असून ज्या राहिलेल्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर शासन दरबारी मांडून समाजाला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल असे आश्वासन विनोद अग्रवाल यांनी दिले.प्रवेश करणाऱ्यांमध्ये राधेश्याम दखनवार, चुन्नीलाल साऊस्कर , रामप्रसादजी मेश्राम, तेजरामजी पंधरे , प्रमिलाबाई साऊस्कर, सीमाताई मेश्राम, सीमाताई धगडे , कल्पनाताई सोनवणे, अनिताताई मेश्राम, गीताताई मेश्राम, सरिताताई पंधरे , सुशीला बोकार खेल वंती दखनववार, जानकीताई दुधबावने, शांताताई साऊस्कर यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. दरम्यान परिसरातले शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते.