33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ १ जुन रोजी औषधी विक्रेत्यांचा स्नेह मिलन मेळावा गोंदियात

१ जुन रोजी औषधी विक्रेत्यांचा स्नेह मिलन मेळावा गोंदियात

0
19

गोंदिया,दि.30 : डिस्ट्रीक्ट केमिस्ट एन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने १ जुन रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा व स्नेह मिलन सभारंभाचे आयोजन आमगाव मार्गावरील जलाराम लॉन्स येथे आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता प्रदर्शनीच्या उद्घाटनाने होणार आहे. दुपारी १२ वाजता पाहुण्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच एका विशेष स्मरणिकेचे प्रकाशन सुद्धा करण्यात येणार आहे. दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत विविध मनोरंजन पर कार्यक़्रम आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय औषधी विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ qशदे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी अखिल भारतीय औषधी विक्रेता असोसिएशनचे सहसचिव अविनाश अग्रवाल, महाराष्ट्र राज्य औषधी विक्रेता असोसिएशनचे सहसचिव प्रसाद दानवे, उपाध्यक्ष मुकुंद दुबे, जुगलकिशोर तापडीया, हरिश गणेशानी, सुरेश सारडा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी सहकुटृूंब उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष उत्पल शर्मा, सचिव सुशील शर्मा, उपाध्यक्ष राजेश अग्रवाल, कोषाध्यक्ष रुपेश रहांगडाले, ललीत सोनछात्रा, रुपेश तिवारी, सुशेनजीत शाह, सुनील गंगवानी, श्याम येवले यांनी केली आहे.

blank