26 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ १४ जूनला जिल्हा नियोजन समितीची सभा

१४ जूनला जिल्हा नियोजन समितीची सभा

0
28

गोंदिया, दि: ११: येत्या १४ जून रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा दुपारी २.३० वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या सभेला जि.प.अध्यक्ष, राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, विधानसभा सदस्य, पालक सचिव गोंदिया, विदर्भ वैधानिक विकास मंडळ सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या सभेमध्ये १४ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या इतिवृत्तास मंजूरी देणे व इतिवृत्तातील कार्यवाही मुद्याचा आढावा घेणे, जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ या वर्षात सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, बिगर आदिवासी उपयोजना या योजनांचा आढावा घेण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० अंतर्गत मे-२०१९ अखेर प्राप्त निधी व खर्चाचा आढावा घेण्यात येईल. तसेच अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या इतर विषयावर चर्चा करण्यात येईल.