37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home Top News वाघ नदीत बुडून युवकाचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

वाघ नदीत बुडून युवकाचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

0
29

गोंदिया,दि.२१ जून : नदीवर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवकाचा वाघ नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२१) सकाळी १० वाजता देवरी तालुक्यातील शिलापूर येथे घडली. ध्रुव उजवनकर (२१) रा. नागपूर असे नदीत बडून मृत्यू झालेल्या विद्यार्थायेच  नाव असून तो देवरी येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयातील बीएसस्सी भाग 1 चा विद्यार्थी आहे.प्राप्त माहितीनुसार ध्रुव व त्याचे मित्र शुक्रवारी सकाळी शिलापूर येथील वाघ नदीत आंघोळ करण्यासाठी गेले होते. दरम्यान ध्रुवचा नदीतील खोल पाण्यात तोल गेल्याने बुडून मृत्यू झाला. परिसरातील गावकऱ्यांच्या मदतीने ध्रुवचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. या घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली आहे. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली असून तरुण पोरगा गेल्याने कुटुबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलला आहे.

blank