महावितरण गोंदिया परिमंडळात आंतररा‍ष्ट्रीय योग दिन साजरा

0
21

गोंदिया,दि.२१  :२१ जुन आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन महावितरण गोंदिया परिमंडळ जुने पॉवर हाउस, रामनगर येथे योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाकरिता प्रामुख्याने योग प्रशिक्षक म्हणुन पतंजली योग समिती व स्वाभिमान भारत तृप्ती ग्रेवाल, रोहीत धार्मीक व अनिरूद्ध कनोजे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी दैनंदीन जिवनात योगाचे महत्व विषद करून सामान्य योग अभ्यासक्रमातंर्गत ताडासन, वृक्षासन, पद्मासन, वज्रासन, वक्रासन,पादहस्तासन, भद्रासन, पवनमुक्तासन, भुजंगासन तसेच प्राणायम इत्यादी योगासनांची उपस्थित अधिकारी कर्मचा-यां समवेत प्रात्याक्षिके सादर केली.कार्यक्रमाला लाभलेल्या योग प्रशिक्षकांचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देउन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहानेयांनी मानले.कार्यक्रमाला कार्यकारीअभियंता (प्रशा.)संतोष कारंडे, कार्यकारीअभियंता (प्रशा.) गोंदिया मंडल श्रीमती आशा वाघमारे, सहा. महाव्यवस्थापक (मासं)असित ढाकणेकर, व्यवस्थापक (विवले) गोंदिया मंडल चंद्रभान वाघ,विधी अधिकारी प्रशांत मडावी व बहुसंख्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.