23.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ जिल्हा पोलिस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा

जिल्हा पोलिस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा

0
25

गोंदिया ,दि.27ः-आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोध दिनानिमित्त जिल्हा पोलिस दला तर्फे २६ जून रोजी शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. पोलिस अधीक्षक विनीता साहू यांच्या उपस्थितीत  इंदिरा गांधी स्टेडियम येथून हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे शुभारंभ करण्यात आले.शहरातील नहरू चौक, गोरेलाल चौक, गांधी पुतळा, जयस्तंभ चौक, आंबेडकर चौक, नेहरू चौक मार्गे इंदिरा गांधी स्टेडियम येथे रॅलीचे समापन करण्यात आले. यावेळी रॅलीत ३२ पोलिस अधिकारी, २८७ पोलिस कर्मचारी, समाज कल्याण विभाग व इतर शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी असे जवळपास ५00 अधिकारी व कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी पोलिस अधीक्षक विनीता साहू यांनी ग्रामीण व विशेषत: शहरी भागात तरूण मुले, विद्यार्थी हे ड्रग्सच्या आहारी जात असून त्यांचे आयुष्य उध्वस्त होवून त्यांच्या कुटूंबावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले. त्यामुळे तरूणांनी ड्रग्सच्या आहारी जावू नये असे आवाहन त्यांनी केले.त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये अमली पदार्थ विरोधादिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील पोलिस स्टेशन हद्दीतील शाळा, महाविद्यालय व झोपडपट्टी परिसरात जनजागृतीपर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

blank