23.4 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ विभागीय आयुक्तांना भेटले कर्मचारी महसूल संघटनेचे शिष्टमंडळ

विभागीय आयुक्तांना भेटले कर्मचारी महसूल संघटनेचे शिष्टमंडळ

0
37

नागपूर,दि.28ः- विभागीय महसूल कर्मचारी संघटना नागपूर विभागाच्यावतीने महसूल कर्मचार्यांच्या विविध मागण्यांना घेऊन आज विभागीय आयुक्त संजीव कुमार यांची भेट घऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.तसेच मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.7 जुर्रे साहेब यांना आंदोलनाबाबत माहिती देऊन मागण्या बाबत चर्चा केली व मागण्या वेळीच मान्य केल्या नाही तर 8 जुलै पासून संपूर्ण नागपूर विभागात आंदोलन सुरू करण्यात येत असल्याचे स्पष्ट सांगितले याप्रसंगी विभागीय अध्यक्ष राजाभाऊ धांडे, स्नेहल खवले विभागीय सरचिटणीस, राज्य पदाधिकारी चंदू प्रधान, शरद मसराम,सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी देवेंद्र शिंदोडकर, संजय माणेकर, राज ढोमने, शैलेंद्र धात्रक,अभिषेक हिवसे, गौरीशंकर ढेंगे,आशिष रामटेके, अजय धर्माधिकारी,राकेशकुमार डोंगरे नितिन पाटील, युवराज भिमटे, हेमंत उमरे ईत्यादी सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

blank