30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ सर्व विभाग प्रमुखांना प्रशिक्षण

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ सर्व विभाग प्रमुखांना प्रशिक्षण

0
30

गोंदिया ,दि.४: : निवासी उपजिल्हाधिकारी गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली १ जुलै रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम२०१५ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना प्रशिक्षण देण्यात आले. सर्व विभागांना आपल्या विभागाच्या ‘आपले सरकारङ्क संकेतस्थळावर अधिसूचित केलेल्या सेवा सामान्य नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून देण्याचे तसेच अधिसूचित केलेल्या सेवांची माहिती व जनजागृती करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले. ‘आपले सरकारङ्क संकेतस्थळावरील विविध विभागाच्या अधिसूचित असलेल्या सेवांचा ऑनलाईन माध्यमातून सामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.