गोंदिया,दि.05ःःशासकीय कार्यालय भाड्याच्या घरात नराहता शासकिय इमारतीमध्येच कामकाज चालावे या हेतूने शासनाच्या वतीने शहरात मागील चार वर्षांपासून कोट्यावधी रुपयाच्या निधीतून प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाची दिरंगाई तर कधी राजकीय पुढार्यांची उदासिनता यामुळे या इमारतीचे अधिकृत लोकार्पण झाले नसले तरी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांनी मात्र आपल्या स्टाईलने त्याचे लोकार्पण उरकुन घेतले होते.त्यावेळी त्यांनी या बांधकामावर व येथीस साहित्य हे निकृष्ठ दर्जाचे असल्याचे सुतोवाच केले होते ते या इमारतीच्या तळमजल्यावरील एक भींत कोसळल्याने त्यावर शिक्कामोर्तंब झालेला आहे.प्रशासीकय इमारतीच्या कोर्टाच्या बाजून असलेल्या प्रवेशद्वाराजवळील वाहनतळाला लागून असलेली भिंत कोसळल्याची घटना पुढे आली. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडून करण्यात आलेल्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यासंबधात बेरार टाईम्सने कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांना विचारणा केली असता माहिती घेऊन सांगतो परंतु आपणाकडे अशी माहीती नसल्याचे सांगत वेळ मारुन नेली होती. तरी लोकार्पणापूर्वीच या इमारतीला ग्रहण लागल्याच्या चर्चा रंगु लागल्या आहेत. तर जयस्तंभचौकाकडील मुख्य प्रवेशद्वाराचे गेटही मागील दोन तीन महिन्यापासून तुटलेल्या अवस्थेत पडलेले असताना बांधकाम विभागाच्या अभियंत्यानी त्याकडे लक्ष दिलेले नाही.तर सध्या हे प्रशासकीय इमारत दारुड्यांसाठी सायकांळी महत्वाचे केंद्र ठरु लागले आहे.प्रवेशद्वाराशेजारीच चहाची दुकाने थाटून वाहतुकीला खोळंबा सुध्दा घातला जात आहे.तर आंबेडकर चौकातील प्रवेशद्वाारशेजारी दारुच्या बाटल्या बघावयसा मिळत आहे.जिल्हा प्रशासनाने तर या प्रशासकीय इमारतीला स्टाँंग्र रुम तयार करुन या ईमारीतीची शोभाही संपविल्याची चर्चा आहे. १ जुलै रोजी आलेल्या पावसामुळे जिल्हा न्यायालयाकडील भागातील प्रवेश द्वराला लागून असलेल्या वाहनतळाजवळील खांबाला लागलेली भिंत कोसळल्याची घटना घडली. यात विशेष हानी झाली नसली तरी संबंधित कंत्राटदाराने केलेल्या कामाची पावती मिळाल्याचे बोलले जात आहे. असे असताना या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आलेल्या संबंधित विभगाकडून इमारतीवरील पाणी पाडण्यासाठी लावण्यात आलेले पाईप बुजल्याने (चोक) सदर भिंत पाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर काहींच्या मते भिंत स्वत:च पडली असून नतंर त्याठिकाणी पाईपचे काम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भिंत पडली अथवा पाडण्यात आली हा विषय असला तरी इमारतीत कोणतेच कार्यालय नसताना किंवा बोटावर मोजण्याइतके कार्यालय सुरु असना सदर पाईप बंद (चोक) झाला कसा असा प्रश्न निर्माण होत आहे. तेव्हा या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.त्यातच या ईमारतीमधील पीओपी पुर्णत कोलमडून पडू लागली आहे.तर काही ठिकाणी फोडण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.माहिती कार्यालयातील आतमध्ये असलेली पीओपी कधी कोसळेल याचा नेम नाही,त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांची सुरक्षा सुध्दा धोक्यात आली आहे.





