27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राजकीय माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान गुरुवारला गोंदियात

माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान गुरुवारला गोंदियात

0
31

गोंदिया,दि.10 : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपा सदस्य अभियानाचे राष्ट्रीय संयोजक शिवराजसिंह चौहान गुरुवार, ११ जुलै रोजी गोंदिया येथे येत आहेत. दुपारी ३.३० वाजता पवार बोर्डींगमध्ये आयोजित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते कार्यकत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याला जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकत्र्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, जिल्हा महामंत्री संघटन विरेंद्र अंजनकर यांनी केले आहे.