26.9 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home Featured News निसर्ग आणि पर्यावरणाची दक्षता घेत साजरे केले साक्षगंध

निसर्ग आणि पर्यावरणाची दक्षता घेत साजरे केले साक्षगंध

0
59

नागपूर,दि.11: सतत वाढणारे तापमान व ऱ्हास होत चालेली वृक्ष याची दखल घेत , वृक्षारोपणाद्वारे साक्षगंध सोहळा साजरा करण्यात आला. वर आकाश दिलीपराव जावळे, वधू सुविधा मधुकरराव भड, यांनी स्वतःचा साक्षगंध एकमेकांना कडूनींबाचे लहान वृक्ष देऊन नव्या जीवनाची सुरवात निसर्ग प्रेम राखत केली. समाज सेवेत तत्पर असणारे दोन्ही कुटुंबियांनी हा विचार अमलात आणून समाजदर्शनी एक आदर्श निर्माण केला आहे.कुठल्याही गजबज वस्तू विकत न घेता पर्यावरण व निसर्गाला शोभेल असे उकृष्ट निर्णय घेतले. याप्रसंगी वन विभाग अधिकारी पिल्लेवार यांनी दोन्ही उभयंताचे स्वागत केले. समोरच्या वाटचालिस निसर्गमय शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्तिथ डॉ.धीरज टेकोडे, डॉ.कीर्ती जावळे, सौ.संगीताताई जावळे,सौ.मालाताई भड,दिलीपराव जावळे, सुदाम साबळे,हर्षवर्धन साबळे, वैष्णवी साबळे,पंचफुला साबळे,मनोहरराव साबळे, जगदीश तट्टे, वैशाली साबळे,मनोहर बेले,हरिभाऊ वानखडे,दादारावजी टेकोडे आदी मान्यवर मंडळी व नातेवाईक उपस्थित होते.