36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ जवाहर नवोदय विद्यालयातील समस्यांची घेतली जिल्हाधिकार्यांनी दखल

जवाहर नवोदय विद्यालयातील समस्यांची घेतली जिल्हाधिकार्यांनी दखल

0
34

blank

गडचिरोली(अशोक दुर्गम),दि.16ःः केद्रशासनाच्या मानव संसाधन विकास मत्रांलया अतर्गत येणाऱ्या जिल्हयातील घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या समस्याचा आढावा जिल्हाधिकारी शेखर सिगं यांनी प्रत्यक्ष विद्यालयाला भेट देवून घेतला.यावेळी उपस्थित पालकांनी जिल्हाधिकारी शेखर सिगं यांचे समोर विविध समस्याच्या पाढाच वाचून विविध समस्या मार्गी लावण्याची विनंती केली. जवाहर नवोदय विद्यालयाच्या वनजमीनीच्या प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येवून प्रथम स्तरावर बाधंकाम विभागाने विद्यालय परिसरात सरंक्षण भित,रस्ते,पथदिवे शुद्ध पाणी,विद्यालयाच्या वसतीगृह दुरूस्ती करिता व इतर सोयीसुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करावे असे निर्देश शालेय प्रशासन व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याना जिल्हाधिकारी यांनी दिले.आढावा बैठकीला जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य जी कोटय्या,सार्वजनिक बाधकांम विभागाचे उपअभियर्ता उरकुडे,नायब तहसिलदार अविनाश पिसाळ,उपप्राचार्य साधना दलेला,घोटचे वनपरिश्रेत्र अधिकारी शेखर तनपूरे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठकीनतंर विद्यालयाच्या परिसरातील मुलांच्या व मुलीच्या वस्तीगृह भोजनकक्ष या ठिकाणी भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली बाधकाम विभागाने आवश्यक बाबीच्या प्रस्ताव सादर करावा असे निदेश दिले.यासह आपल्या स्तरावरील विकास कामाना गती देवून समस्या सोडविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी पालकाना दिले.
घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या समस्याबाबत जवाहर नवोदय विद्यालय पालक सघंटनेच्या वतीने निवेदन देवून समस्या सोडविण्याची मागणी रेटून धरली होती. जिल्हाधिकारी शेखर सिंग आढावा बैठकीसाठी घोट येथे येणार असल्याची पूर्वकल्पना असल्याने अनेक पालक या बैठकीला उपस्थित होते.यावेळी विद्यालयाच्या विविध अडचणी जिल्हाधिकारी यांचे समोर प्रखरते पालकांनी मांडल्या याप्रसंगी नवोदय विद्यालय पालक समितीचे कार्यअध्यक्ष ओमप्रकाश साखरे,नरेश जामंपलवार,एम.बी.कळते, अरूण पत्रे,नितीन भडांगे,रविद्र आयतूलवार,पुडंलिक पेन्दाम, शरद पाथरडे,राजीव येलेवार, रोशन उके,बडूं तिलगामे, पुरुषोत्म चापले,सोहन मोहोरकर आदी उपस्थतीत होते

blank