25.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home मराठवाडा/खान्देश नगमा शिवपालक यांना विशेष पुरस्कार

नगमा शिवपालक यांना विशेष पुरस्कार

0
27

सोलापूर,दि.22 : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त अकलूजच्या रनरागिणी नगमा शिवपालक यांचा पुणे येथे विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समिति पुणे यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील व सामाजिक कार्याबद्दल लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी विशेष सन्मान पुरस्कार अकलूजच्या रनरागिणी नगमा शिवपालक पच्छिम महाराष्ट्र अध्यक्षा दलित महासंघ यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे व दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहूल डंबाळे, नगरसेवक अविनाश बागवे, अनिल हातागळे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.