खा. मेंढे यांनी घेतला सिंचन योजनांचा आढावा

0
19

भंडारा,दि.22ः-पावसाच्या अभावामुळे धान शेतीवर आलेले संकट लक्षात घेऊन खासदार सुनील मेंढे यांनी मतदारसंघातील सिंचन योजनांचा विस्तृत आढावा नुकताच घेतला. डावा कालवा, उजवा कालवा, नेरला उपसा सिंचन, टेकेपार उपसा सिंचन, करचखेडा उपसा सिंचन इत्यादी विविध योजनांची सद्य:स्थिती तसेच सध्या होत असलेल्या पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन अधिकार्‍यांनी पाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश खासदारांनी दिले आहेत. तसेच उपसा सिंचन योजनेची आवश्यक ती दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले आहे. आगामी काळात आवश्यक असलेल्या पाण्याच्या पातळीचे नियोजन हे सर्व अभियंत्यांनी अग्रक्रमाने आणि जागरूकतेने केले पाहिजे अशी अपेक्षा देखील मेंढे यांनी बैठकीत व्यक्त केली.
यावेळी सिंचन विभागातील झोड, हरिनखेडे, लेंडे, उराडे, गायधने, अमोल वैद्य, गायधनी तसेच अनिल मेंढे, प्रंशात खोब्रागडे, अरविंद भालाधरे, किशोर पंचभाई, राजेंद्र फुलबांधे, मोहन सुरकर, विनोद बांते, धनराज जिभकाटे, अमोल उराडे व अन्य शेतकरी उपस्थित होते.