गडचिरोली मध्ये महसूल दिन साजरा
गडचिरोली, दि.०2: महसूल वर्षाचा पहिला दिवस महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, महसूल विभाग हा आपल्या कामाबरोबर जिल्हयातील महत्वाच्या आरोग्य व शिक्षण योजनांच्या अंमलबजावणीसाठी कार्य करेल. तसेच अन्य योजनांच्या कामांमध्ये सर्कीय सहभाग घ्यावा असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी पुढे बोलतांना म्हणाले की, आपल्या जिल्हयात विकासाला चालना मिळण्यासाठी ज्या ज्या योजना आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महसूल विभाग यापूढेही कार्य करेल, खऋठ व उऋठ मध्ये गडचिरोली जिल्हयाने खुप चांगले काम केले आहे. महसूल विभागाची प्रतिमा ही तलाठया मार्फत वृदधींगत होत असते. त्यामुळे त्यांनी गावपातळीवर चागल्या प्रकारे लोकांशी संपर्क वाढवावा. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला चांगला प्रतिसाद द्यावे व त्यांना माहिती व पुढील कामाबाबत नियोजन सांगा असे ते म्हणाले.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, उप वनसंरक्षक कुमार स्वामी , अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, पुरवठा अधिकारी महेश पाटील, उपनिवडणूक अधिकारी कल्पना निळ, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया जाधव, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, ठाणेदार चौगांवकर, उप विभागीय अधिकारी विशाल मेश्राम (देसाईगंज), जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख एस.आर.बन, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ उपस्थित होते.
जसे १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत हे आर्थिक वर्ष असते. तसेच १ ऑगस्ट ते ३१ जुलै महसूली वर्ष मानले जाते. या कालावधीच्या शेवटी वर्षभरातील महसूल आकारणी व वसूली यांचा ताळमेळ घालण्याचे काम महसूल विभागा कडुन केले जाते. राज्यात १९ जुलै २००२ परिपत्रका नुसार महसूल दिन साजर केला जात आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन देणे व बळकटी देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन सर्व महसूली यंत्रणे मार्फत केले जाते. याचवेळी प्रामुख्याने लोकांशी निगळीत विविध महसूली तसेच विकास योजनाची माहिती गावस्तरावर पोहचविण्याचे कार्य महसुल विभाग करतो. महसूल दिनानिमित्त शिधापत्रिका वाटप केले, गॅस शेगडीचे वाटप, जातीच्या दाखल्याचे वाटप केले. तसेच यावेळी अधिकारी कर्मचारी यांना विशेष कामगिरी मार्फत गौरविण्यात आले. तसेच यावेळी दायित्व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. निवडणूक विभागातील विविध स्तरावर काम केलेले अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. महसूल विभागातील काम जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावे यासाठी महसूल विभाग कटीबध्द असेल असे मत निवासी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी इंदुराणी जाखड यांनी उपस्थित महसूल अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना सांगूण लोक कल्याणासाठी महसूल विभागाने कार्य करावे. आपल्या योजनांमधून प्रत्यक्ष नागरिकांना लाभ देऊन विकासासाठी कार्य करु शकतो व करणे आज गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे हस्ते जिल्हाधिकारी कार्यलयाच्या परिसरात वृक्षरोपन करण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री देवेन्द्र दहीकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार नायब तहसिलदार चव्हाण यांनी केले





