गोंदिया,दि.१७: युवा स्वाभिमान पक्षाच्या मार्गदर्शिका व अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ.नवनीत रवी राणा यांचे शनिवार (दि.१७) गोंदियात प्रथम आगमनानिमित्ताने भव्य सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. गोंदिया जिल्हा युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन कन्हारटोली स्थित पोवार बोर्डिंग येथे सायंकाळी ३ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी जिल्हास्तरीय युवा स्वाभिमान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकत्र्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याला गोंदिया जिलह्यातील कार्यकत्र्यांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिलध्यक्ष जितेश राणे यांनी केले आहे.