बाबरवस्तीत स्वातंत्र्य दिन साजरा 

0
20

संख : पांडोझरी (ता जत) येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक  मराठी शाळेत मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा  करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण तुकाराम कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा  व्यवस्थापन समिती अध्यक्ष सविता मोटे होत्या .स्वातंत्र्यदिनानिर्मित्त शाळेच्या मुलांची  भाषणे ,देशभक्तीपर गीते,,संचालन  लेझीम, सादर  करण्यात आल्यानंतर  गुणवान विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान  करण्यात आले. शाळेतील मुलांनी महापुरुषांच्या स्वातंत्र्यलढ्याच इतिहास वाचला पाहिजे आणि त्यातून त्या महापुरुषांच्या विचारांच अनुकरण केलं पाहिजे या उद्देशाने शाळेत सर्व कार्यक्रम राबवले पाहिजे.तरुणांनी व्यसनमुक्त होऊन करिअर कडे लक्ष द्यावं आणि पालकांनी मुलांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघून त्यांच्या शिक्षणावर भर दयावे अशा पद्धतीने प्रमुख वक्ते आनंद कांबळे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी तुकाराम कोरे, अरुण सोनकांबळे ,सिध्दार्थ कांबळे, सविता मोटे,कविता कोरे पूनम गडदे, राजाराम गडदे,श्रीशैल येळझरी,राकेश कांबळे,आप्पासो मोटे,मल्लाप्पा कोरे शिवाप्पा कोरे,व माता पालक , शिक्षक ,ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी केले.