31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home क्रीडा न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

0
29

blank

सालेकसा,दि.18ः-तालुक्यातील साखरीटोला येथील न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थ्यानी तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत उलेखनिय कामगिरी केल्याने जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.आमगांव येथे शालेय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात प्रतीक भावे यांना सवर्ण पदक, अक्षद मेंढे यांना रजत पदक, ययाति लांजेवार यांना सवर्ण पदक, उन्नति बघेले यांना रजत पदक, प्राची चुटे यांना  सवर्ण पदक, आणि भाग्यश्री मेंढे यांनी रजत पदक मिळाले.विद्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय न्यू चैम्पियन कराटे क्लबचे प्रशिक्षक ममता गायधने, हिमांशी शहारे, नीलकंठ दोनोडे, जी.डी.भंडारकर,व आपल्या आई वडिलांना दिले. विद्यार्थ्यानी कराटे स्पर्धेत आपले आणि साखरीटोला गावiचे नाव गौरन्नवित्त केल्यामुळे तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे, सामाजिक कार्यकर्ते सुनील अग्रवाल, कृषि केंद्र संचालक देवराम चुटे, डॉ संजय देशमुख, डॉ अजय उमाटे  माजी प.स. सदस्या संगीताबाई शहारे, मुख्याध्यापिका इंदुताई कोरे, व गावक-यानी अभिनंदन केले आहे.

blank