25.3 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ पोडसा गावालगत विषबाधेने वाघाचा मृत्यू?

पोडसा गावालगत विषबाधेने वाघाचा मृत्यू?

0
36
file photo

चंद्रपूर,दि.26ः-मध्यचांदा वनविभाअंतर्गत येणार्‍या धाबा वनपरिक्षेत्रातील पोडसा(जुना) गावालगत वाघाचा मृत्यूदेह शनिवारी सायंकाळी आढळून आला. यामुळे गावकर्‍यांमध्ये खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाची चमू घटनास्थळी हजर झाली. मात्र, शनिवारी रात्री उशिर झाल्याने दुसर्‍या दिवशी (दि.२५) सकाळपासून वनविभागाची चमू घटनास्थळी दिसून आली. यावेळी वाघाचा विषबाधेने मृत्यू झाल्याचा प्रथमिक अंदाज उपस्थित वनाधिकार्‍यांनी वर्तवला असून, शवविच्छेदनानंतर घटनास्थळीच वाघाला जाळण्यात आले.
महाराष्ट्र-तेलंगणा सिमेवर असलेल्या पोडसा (जुना) येथील संतोष चनकापुरे यांच्या शेतात मृत वाघ आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाची चमू घटनास्थळी हजर झाली. अन् मृत्यूच्या कारणांचा शोध सुरू झाला. वाघाच्या मृत्यू स्थळापासून साधारणत: २00 मिटर दुरीवर डुकर मृतावस्थेत दिसून आला. डुकराजवळ विषारी औषधी या शोधमोहिमेत आढळून आली. यावरून विषबाधेने वाघ आणि डुकराचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज यावेळी घटनास्थळी उपस्थित वनाधिकार्‍यांनी व्यक्त केला. यानंतर वाघाचे शवविच्छेदन करून घटनास्थळाजवळ जाळण्यात आले.
यावेळी चंद्रपूर वनवृताचे मुख्य वनसरंक्षक रामाराव, मानद वन्यजीव संरक्षक बंडू धोत्रे, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, साहाय्यक उपवनसंरक्षक विवेक मोरे, धाब्याचे वनपरिक्षेत्राधिकारी डि.एस.राऊतकर, दीपक वांढरे आदीसह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

blank