गोरेगाव,दि.२७ः-शासनाच्या विविध विकास योजनेंतर्गत गोरेगाव नगर पंचायतीला मिळालेल्या २३ कोटी ८७ लाख रुपयाच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा बुधवारला(दि.२८)दुपारी ३ वाजता नगर पंचायत कार्यालयासमोर आयोजित करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष इंजि.आशिष बारेवार यांनी दिली.या विकास कामांचे भूमिपूजन तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांच्या हस्ते होणार आहे.अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ.परिणय फुके राहणार आहेत.तर विशेष अतिथी म्हणून खासदार सुनील मेंढे,आमदार संजय पुराम,माजी आमदार हेमंत पटले,माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे,माजी आमदार खोमेश्वर रहागंडाले,माजी सभापती लक्ष्मीकांत बारेवार,जि.प.समाजकल्याण सभापती विश्वजित डोंगरे,माजी सभापती दिलीप चौधरी,जीडीसीसीचे संचालक रेखलाल टेंभरे,भाजप तालुकाध्यक्ष लक्ष्मण भगत,संघटनमंत्री वीरेंद्र अंजनकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.ही कामे नगरपंचायत वैशिष्टपुर्ण योजनेंतर्गत ११ कोटीच्या विशेष अनुदानातून तसेच नवीन नागरी सुविधा पुरविण्यासाठी साहाय्य योजनेंतर्गत २ कोटी,वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत १० कोटी,दलीत्तोतर योजनेतून २५.८५ लाख,नगरोत्थान योजनेतून १६.५० लाख,दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत ७.८८ लाख,१४ व्या वित्त आयोगांतर्गत qवधन विहीर-२८ लाख व नागरी सुविधा योजनेंतर्गत एलईडी हायमास्ट उभारण्याकरिता ९ लाख रुपयाचा निधी नगरपंचायतीला प्राप्त झालेला आहे,त्यातून ही कामे करण्यात येणार आहे.या भूमिपूजन सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष इंजि.आशिष बारेवार,उपाध्यक्ष सुरेश रहागंडाले,बांधकाम सभापती हिरालाल रहागंडाले यांच्यासह सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी केले आहे.





