24.6 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ ओबीसींची जनगणना न करणाèङ्मा सरकारला धडा शिकवा

ओबीसींची जनगणना न करणाèङ्मा सरकारला धडा शिकवा

0
31

भंडारा,दि.27: ओबीसी प्रवर्गावर सतत अन्याय केला जात आहे. बाजारीकरणामुळे ओबीसी योग्य प्रकारे शिक्षण घेऊ शकत नाही. मंडल आयोगामुळे थोडाफार अधिकार मिळत होेते. त्यापासून ही वंचित ठेवण्यात येत आहे. एकीकडे प्रगत जातींना आरक्षण दिले जात असताना ओबीसींचे आरक्षण कमी केले जात आहे. सरकार मनुवाद्यांचे लाळ पुरवित आहे. त्यामुळे ओबीसींनी जागृत व्हाङ्मला पाहिजे, अन्यथा भयंकर परिणाम भोगावे लागणार आहेत. असा इशारा ओबीसी धरणे आंदोलनातून देण्यात आला. ओबीसी तरुणांनी अधिकारासाठी लढा देत सचेत राहून प्रचार व प्रसार करण्याची जवाबदारी स्विकारावी असे आवाहन ही यावेळी करण्यात आले.
ओबीसीवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व अत्याचार बंद करुन न्याय अधिकार मिळविण्यासाठी ओबीसी जातीनिहाय जनगणना परिषद व अन्याय निवारण संघर्ष समितीच्या संयुक्त विद्यमाने २६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध ओबीसी पुढाèयांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वतंत्र भारतात अजूनही जातीनिहाय जनगणना झालेली नाही. ओबीसीवर संविधान विरोधी लावलेली क्रिमिलेअरची अट रद्द तर १ ते १० पर्यंतच्या शालेय विद्यार्थी व विद्यापीठस्तरीय मुलामुलींना शिष्यवृत्ती व कर्मचाèयांना पदोन्नती मिळाली पाहिजे. ओबीसी शेतकèयांना शासकीय योजनांचा लाभ १०० टक्के मिळाला पाहिजे. आदि मागण्या घेवून २६ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.
सामाजिक, सांस्कृतीक व आर्थिकदृषट्या मागासलेला ओबीसी समाज मंडल आयोगापासून मिळणाèया आरक्षणापासून दूर फेकल्या जात आहे. कोणत्याही समाजाच्या उज्वल भविष्य त्या समाजाला मिळणारे शिक्षण, नोकèया, उद्योग व शेतीतील संधी व सुविधा यावर अवलंबून असते. त्याच देशाचे भवितव्य अवलंबून असते. सध्या ८५ टक्के बहूजन समाजास आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्याचा विरोध करण्यासाठी ओबीसी समाजाने एकत्र येवून जागृत होवून अन्यायाचा विरोध करण्याची गरज आहे. ओबीसी समाज राजकारण्यांच्या षडयंत्रात फसून राहिला तर सŸंपूर्ण ओबीसीची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. हे प्रत्येकाने जाणून घेत जनजणनेसाठी सरकारवर दबावतंत्र तयार करण्याचे आवाहन धरणे आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला. इंकलाब qजदाबााद, ओबीसी आरक्षण qजदाबाद आदी नारे देत मनुवादी प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. यावेळी गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर येथे ओबीसी पदाधिकाèयांच्या अटकेच्या विरोधात सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. येत्या डिसेंबर महिन्यात भंडारा जिल्ह्यात जनजणनेसाठी व जनजागृती करिता आंदोलन उभारण्याची घोषणा करण्यात आली.
तेव्हा ओबीसींनी जाने व्हाा, संघर्षात सामील व्हा, असे आवाहन करण्यात आले. धरणे आंदोलनात सदानंद इलमे, डॉ. बाळकृष्ण सावो, भगीरथ धोटे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे के.आर. कहालकर, शामराव झलके, प्रदीप कडव, प्रभु मरो, बालू ठवकर, शंकरराव उपासे, मंगला डहाके, मोरेश्वर कुथे, डॉ. मुकेश पुडके, योगेश फुटे, रामचंद्र राऊत, चंद्रप्रकाश खेत्रे, दत्तात्रय वानखेडे, पूजा ठावकर, राजेश लिचडे, पांडुरंग फुंडे, मुरलीधर भुरे, संजय आजबले, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भैयाजी लांबट, गोपाल सेलोकर,वामनराव वझाडे, प्रभाकर कळंबे, मोरेश्वर मते, अज्ञात रार्घोते, गोपाल देशमुख, उमेश मौजे, वहीद शेख, धनंजय कापगते, वाल्मीक गोबाडे, भोजराज गभणे, मधुकर गभणे, मिलीद करंजेकर, के.झेड. शेंडे, संजय मते, संजय पटले, मयूर बिसेन, देवचंद चौधरी, चंद्रशेखर रहांगडाले, ज्ञानेश्वर रहांगडाले, नेŸपाल चिचमलकर, अरqवद माथुरकर व मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले होते. अप्पर जिल्हाधिकाèयांना शिष्टमंडळान निवेदन सादर केले.

blank