23.5 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ अधिपरिचारीकाचे वैद्यकीय महाविद्यालयासमोर निदर्शने

अधिपरिचारीकाचे वैद्यकीय महाविद्यालयासमोर निदर्शने

0
30

गोंदिया,दि.28 : स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत अधिपरिचारीका व अधिपरिचारकांना गेल्या ६ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. या संदर्भात पाठपुरावा करूनही महाविद्यालय प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे उपासपोटी सेवा किती दिवस पुरवावी? असा सवाल उपस्थित करीत  (दि.२७) अधिपरिचारीका व अधिपरिचारकांनी महाविद्यालयीन डीनच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. या बाबीची दखल घेण्यात आली नाही तर आज (दि.२८) पासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वॉर्डामध्ये अधिपरिचारीका सेवा पुरवित आहेत. मात्र, ५ ते ६ महिन्यांपासून महाविद्यालयीन प्रशासनाकडून वेतन देण्यात आले नाही. मागील ३ वर्षापासून प्रशासन विभागातील कर्मचारी सतत त्रृटीपूर्ण देयके सादर करीत आहेत. त्यामुळे अनियमित वेतन होत आहे. त्यातच ६ महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे अधिपरिचाका व अधिपरिचारकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणखी किती दिवस उपासपोटी सेवा पुरवावी? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे आज, वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनातील ढिसाळ कामाविरूध्द निदर्शने करण्यात आली.