24.4 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ सुलभ निवडणूकीसाठी योग्य नियोजन करावे : जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे

सुलभ निवडणूकीसाठी योग्य नियोजन करावे : जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे

0
20

विधानसभा निवडणूक तयारीपूर्व आढावा
गोंदिया,दि.28:- आगामी विधानसभा निवडणूक 2019 करिता भारत निवडणुक आयोगाने  “सुलभ निवडणूका” हे घोष वाक्य जाहिर  केले आहे. मतदारांना विविध सोयी-सुविधा तसेच त्यांच्या अनेक अडी-अडचणी व समस्यांचे निराकरण करण्याचे उदिष्ट प्रशासनाकडूण नियोजित करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ. कादम्बरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुखांची विभागनिहाय विधानसभा निवडणूक तयारीपूर्व आढावा बैठक दिनांक 26 ऑगस्ट रेाजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली.
येत्या 31 ऑगस्ट 2019 रोजी मतदार यादिचे प्रकाशन होणार असून निकाली काढण्यात आलेले दावे/ हरकतीच्या उच्चतम तपासणीचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी या वेळेस दिले. या बैठकीत कायदा-सुव्यवस्था तसेच मतदान केन्द्रांवर दिव्यांग व वयोवृध्द मतदारांसाठी विशेष सुविधा, नोडल आफिसर नियुक्त करणे, निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रचार प्रसार करणे, अतिसंवेदनशील मतदान केन्द्रांवर सी.सी.टिव्ही कॅमरे, तसेच निणडणूकीचे सर्व महत्वाचे कामे दिलेल्या वेळेच्या आत करण्याचे स्पष्ट निर्देष देऊन जवाबदारी निश्चित करण्यात आली. नवमतदारांना लोकशाही प्रकियेमध्ये समावून घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करुन निवडणूकीच्या उत्सवात सहभागी करण्याची सूचना देण्यात आल्या. तसेच स्वीप कार्यक्रम अंतर्गत जिल्हयात प्रचार प्रसार करुन मतदारांच्या अधिकाराची जाणीव करुन देणे इत्यादी बाबत आढावा घेण्यात आला.
या वेळेस अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी  उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे, राहुल खांडेभराड, पोलिस उपअधिक्षक (गृह) सोनाली कदम, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी विजय चौव्हाण, कार्यकारी अभियंता सा.बा. क्र.1 मिथीलेश चौव्हाण, कोषागार अधिकारी व्ही.ए. जवंजाळ, जिल्हा नियोजन अधिकारी प्र.वि. बुलकुंडे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवरे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, सहाय्यक सुरेश वास्नीक, जिल्हा प्रशासन अधिकारी विनोद जाधव, निवडणूक ना. तह हरीशचंद्र मडावी, सहा. अधिक्षक आर.एस.पटले, प्रवीण जमधाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

blank