24.6 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ रानगव्याने शेंडा परिसरात माजविला धुमाकूळ

रानगव्याने शेंडा परिसरात माजविला धुमाकूळ

0
49

सडक अर्जुनी,दि.28 : तालुक्यातील शेंडा या जंगलपरिसरात मंगळवारच्या (दि.२७) सकाळी ७ वाजेच्या सुमारास रानगव्याचे दर्शन होताच, नागरिकांमध्ये एकच धावपळ सुटली. रानगव्याने जवळपास १ ते दिड तास गावात शैरावैरा फिरून वाडी, कुंपणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या घटनेची  माहिती लगेच सडक अर्जुनी वनविभागाला देण्यात आली. मात्र, वनविभागाचे कर्मचारी रानगवा जंगलाच्या दिशेने निघाल्यावर पोहोचले. यामुळे कदाचित रानगव्याचे किंबहुना नागरिक तसेच पाळीव प्राण्याची जीवित हानी झाली असती तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न वनविभागाच्या लेटलतिफीवर उपस्थित केला जात आहे. उल्लेखनिय असे की, ६ महिन्यापूर्वी शेंडा परिसरात एका बिबट्याच्या पिल्लूच्या मृत्यू प्रकरणी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.शेंडा परिसर जंगलशिवाराला लागून असल्याने नेहमीच वन्यप्राण्यांची वर्दळ असते. मात्र, वनविभाग किंवा वन्यजीव संरक्षण विभागाकडून या बाबत कसलीही दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे कधीही वन्यप्राण्यांचे जीव तर कधी नागरिकांचे जीव धोक्यात येत असते. दरम्यान प्रकरण अंगलट येवू नये म्हणून यंत्रणा त्या प्रकरणात नागरिकांना जबाबदार ठरवित असते, असे सहा महिन्यापूर्वीच एका बिबट्याच्या मृत्यू प्रकरणावरून समोर आले.  शेंडा गावात जवळपास १ ते दीड तास रानगव्याने शैरावैरा धुमाकूळ घातला. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये एकच धावपळ सुटली होती. दहशतीपोटी नागरिकांना घरातच दडून रहावे लागले. या प्रकराची माहिती भ्रमणध्वनीवरून सडक अर्जुनी वनविभागाला देण्यात आली. मात्र, अवघ्या १४ किमी अंतरावर असलेल्या शेंडा गावात वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पोहोचू शकले नाही. अखेर रानगव्याने जंगलाच्या दिशेने पलायन केले अन् नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. यानंतर वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले. तोपर्यत रानगव्याने गावातील नागरिकांच्या वाडी, कुंपणाचे चांगलेच नुकसान केले होते. या प्रकारामुळे वनविभागविरूध्द शेंडावासीयाकडून चांगलाच संताप व्यक्त केले जात आहे. एखादी घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण? असाही सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

blank