25.2 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ समता सैनिक दलाची सभा संपन्न ;”बोधानंद गुरुजींचे दल अनाधिकृत “

समता सैनिक दलाची सभा संपन्न ;”बोधानंद गुरुजींचे दल अनाधिकृत “

0
60

अर्जुनी मोर.दि.0१ : समता सैनिक दल गोंदिया जिल्ह्याचे वतीने जिल्हास्तरीय सभा दिनांक 28 ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव येथे घेण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाच्या जिओ सी सुरेखा टेंभुर्णे होत्या. सभेमध्ये . बोधानंद गुरुजी यांना समता सैनिक दलाच्या राष्ट्रीय कार्यकारणीने एका आदशान्वये समता सैनिक दलाच्या विदर्भ प्रमुख पदावरुन दि.2/6/2019 ला पदमुक्त केले.मुख्य समता सैनिक दलाच्या शाखांसी बोधानंद गुरुजींचा काही संबध राहिला नसतानाही बोधानंद गुरुजी अनाधिकृतपणे अर्जुनी मोर तालुक्यात समता सैनिक दलाच्या शाखा स्थापन करुन तालुका कार्यकारिणी सुध्दा स्थापन करित आहेत.त्यामुळे ते अर्जुनी मोर तालुक्यातील समता सैनिक दलात फुट पाडण्याचे काम करीत असल्याचा आरोप सभेत करण्यात आला. त्याच्या ह्या अनाधिकृत कार्यामुळे ते समाजात विषमता निर्माण करीत आहेत. बोधानंद गुरुजींच्या अनाधिकृत कार्यावर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समता सैनिक दलाची तात्काळ बैठक बोलावण्यात आली. बोधानंद गुरुजी अर्जुनी मोर तालुक्यात स्थापन करीत असलेल्या समता सैनिक दलाच्या शाखा ह्या अनाधिकृत असुन या शाखांचा मुख्य समता सैनिक दलासी काही सबंध नसल्याचा ठरावसुध्दा पारीत करण्यात आला. तालुक्यातील ज्या गावात दलाच्या नवीन शाखा तयार करायच्या असल्यास मुख्य दलाच्या तालुका कमांडर किंवा दिलवरभाई रामटेके. मिथुन मेश्राम. आकाश ठवरे.सुरेखा टेंभुर्णे. रत्नमाला कुटारे किंवा जिल्हाकार्यकारिणीसी संपर्क साधावा असेही सभेत सांगण्यात आले.
सभेला हिरकचंद टेंभुर्णे. हेमचंद लाडे.अमरदास क-हाडे. गोपीनाथ सांगोळे. मनोहर लांडगे. तेजराम टेंभुर्णे. सुरेखा टेंभुर्णे. शसिकला सांगोळकर. फरिदा तिरपुडे. सुगंधा नागदेवे तारा टेंबुलकर उज्वला खोचे मंजुषा वासनिक पुष्पा भालाधरे प्रमिला नंदेश्वर व विविध गावातील समता सैनिक दलाच्या महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.सभेमधे दिलवरभाई रामटेके यांनी समता सैनिक दलाच्या संदर्सभात विस्तृत माहीती देवुन अर्जुनी मोर तालुक्यात दलाचे जाळे पसरवुन समता सैनिक दल मजबुत करण्याचे आवाहन केले.संचालन मिथुन मेश्राम यांनी तर आभार आकाश ठवरे यांनी केले.

blank