
सीईओच्या आदेशावर बीडीओंनी बनविले मुख्याध्यापकासह इतरांना सचिव
गोंदिया,दि.०५ः-गेल्या २२ ऑगस्टपासून ग्रामसेवक संघटनेने पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज रखडले गेल्याने गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाèयाने उच्चश्रेणी मुख्याध्यापकासह, केंद्रप्रमुख,आरोग्य विस्तार अधिकारी,शिक्षण विस्तार अधिकारी,शाखा अभियंता,आरोग्य सहाय्याक, अंगणवाडी पर्यवेक्षिका,पशुधन पर्यवेक्षकांसह इतरांना ग्रामपंचायतीच्या सचिव पदाचा कार्यभार सोपविण्याचे निर्देश ४ सप्टेंबरला दिल्याने मुख्याध्यापकांना शिक्षक दिनाच्या दिवशीच ग्रामपंचायीचे बाबू होण्याचे स्वप्न पुर्ण होणार आहे.४ सप्टेंबरला गोरेगाव व गोंदिया पंचायत समितीच्या गटविकास अधिकाèयांनी काढलेल्या पत्रानुसार ग्रामविकास विभागाचे उपसचिवांनी ३१ ऑगस्टला दिलेल्या पत्राचा संदर्भ घेत या नियुक्ता करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.आधीच मुख्याध्यापक शिक्षण विभागाच्या विविध कामात गुतंलेले असताना शाळेकडे पुरेसा वेळ देऊ शकत नाही,त्यातच आता ग्रामपंचायतीचाही अतिरिक्त कामकाज त्वरीत सांभाळावयाचा असल्याने शिक्षणाचा पुर्णत बोजवारा उडविण्याचा निश्चय शासनाने घेतल्याचे दिसून येत आहे.
आपल्या विविध मागण्याना घेऊन बेमुदत संप करीत असलेल्या ग्रामसेवकांमुळे कामकाजावर विपरित परिणाम होत असल्याने मुख्याध्यापकासह इतर पदावरील कर्मचाèयांना आंदोलन संपेपर्यंत तात्पुरती नियुक्ती करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉŸ.राजा दयानिधी यांनी दिले आहेत.त्यानुसार गोंदिया तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीचा कारभार आज शिक्षकदिनी मुख्याध्यापकांना स्विकारावा लागणार आहे.एकीकडे शिक्षक दिन साजरा होत असताना मुख्याध्यापकांना मात्र ग्रामसेवक म्हणून काम करण्याची संधी गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायतच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देत महाराष्ट्रात नवा पायंडा पाडला आहे.गोरेगाव तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीचा कारभारही अशाच पध्दतीने देण्यात आला असून ३७ पैकी १७ उच्चश्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख तर २० ग्रामपंचायतीचा कारभार हा पशुधन पर्यवेक्षक,आरोग्य विस्तार अधिकारी,अंगणवाडी पर्यवेक्षक,शाखा अभियंता व विस्तार अधिकारी पंचायत यांच्याकडे सोपविण्यात आल्याचा पत्र ४ सप्टेंबर रोजी गोरेगाव व गोंदिया पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी जारी केले आहे.




